नागडं झाल्यावर काम मिळतं का? विचारणाऱ्याला अभिनेत्रीचं जोरदार उत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेत्री मिताली मयेकर नुकतंच तिच्या काही मैत्रिणींबरोबर इंडोनेशियामधील बाली हे शहर फिरायला गेली होती. इंडोनेशियामध्ये असलेल्या पिंक बीचवर अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. या फोटोला मितालीने ‘पिंक बीच’ असं कॅप्शन दिलं आहे. यावर एका नेटकऱ्याने फोटोवर विचित्र कमेंट केली. पिंक बीचच्या फोटोवर एका नेटकऱ्याने नागडं झाल्यावर चित्रपटात काम मिळतं का?, असा विचित्र प्रश्न विचारला. यावर मितालीने सडेतोड उत्तर दिलं आहे. माहिती नाही बुवा… बघा प्रयत्न करून, असं सडेतोड उत्तर दिलं आहे.

दरम्यान, मिताली मयेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, मिताली आणि सिद्धार्थ चांदेकरची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांच्याही लग्नाला येत्या जानेवारी महिन्यात 3 वर्ष पूर्ण होणार आहेत.

काही बोल्ड फोटोंमुळेही मिताली कायम चर्चेत राहिली. अनेकांनी ट्रोल केलं तर अनेकजण तिच्या बोल्डनेसवर फिदाही झाले. दरम्यान कधीकधी मितालीने तिच्या ट्रोल्सना सडेतोड उत्तरही मिताली नेहमी देता दिसते.

यंदाच्या वर्षात मिताली स्पेन, फ्रान्स, इंडोनेशिया, बँकॉक असे अनेक देश फिरण्यासाठी गेली होती. 2023 मध्ये केलेल्या जगभ्रमंतीच्या खास आठवणी मितालीने एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ कारणामुळे पंगाक्वीन कंगनाची झोप उडाली, लोकांना केली ही विनंती

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा