बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ रस्त्याला मिळालं ए.आर.रेहमानचं नाव, वाचा सविस्तर

मुंबई। बॉलिवूड म्यूजिकचा किंग ए आर रेहमान यांने आपल्या संगीतानं श्रोत्यांना वेड लावलं आहे. काही दिवसांपूर्वी ए आर रेहमान याला ऑस्कर मिळाला होता.

त्यानंतर आता त्याचा कॅनडा येथे सन्मान करण्यात आला इतकंच नव्हे तर कॅनडाच्या मरखम शहरात एका रस्त्याला ए आरचं नाव देखील देण्यात आलं. ए आर रेहमानचं रस्त्याला नाव देण्याची ही दुसरी वेळ आहे, या आधी सुद्धा कॅनडा येथे एका रस्त्याला रेहमानचं नाव देण्यात आलं होतं.

याबद्दल रेहमानने आपल्या सोशलमीडिया अकाऊंटवरून याची प्रतिक्रिया दिली, त्याने ट्विट करत लिहिलं की, कॅनडातील रस्त्यावरची माझ्या नावाची पाटी पाहून माला फार आनंद झालं. सोबतच त्याने कॅनडाच्या महापौरांचे आभार देखील मानले.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More