मुंबई | कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही दिवसेंदिवस कोरोनाबाधितरुग्णांची संख्या वाढू लागली आहे.त्याणध्ये आता एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा शेवटची पेपर राहिला असताना राज्य बंद केलं गेलं.
राज्यात लॉकडाऊन करूनही कोरोनाचा व्हायरस वाढत आहे. त्यामुळे दहावीची भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्यावेत, अशी मागणी शिक्षक व पालक वर्गातून होत आहे.
भूगोलच्या 50 गुणांपैकी 10 गुणांची परीक्षा शाळेत घेण्यात आली आहे. यामुळे सरकारने 40 गुणांची लेखी परीक्षा रद्द करावी व विद्यार्थ्यांना त्या विषयात सरासरी गुण द्यावे किंवा 550 गुणांपैकी निकाल जाहीर करावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केली आहे.
इयत्ता दहावीचा 23 मार्च रोजी होणारा भूगोलाचा पेपर होऊ शकला नाही. आता ही परीक्षा कधी होईल याबाबत 14 एप्रिलनंतर निर्णय घेण्यात येईल, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं. मात्र आता ही परिस्थिती आणखीच गंभीर होताना दिसत आहे. यामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पहिलं प्राधान्य लोकांच्या जीवाला, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं- सुरेश रैना
दगडूशेठ गणपती ट्रस्ट मदतीला धावलं; केली गरजू नागरिकांना मदत
महत्वाच्या बातम्या-
आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…
सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात
अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह
Comments are closed.