बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परीक्षा रद्द करा किंवा तयारीसाठी पुरेसा वेळ तरी द्या; पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची मागणी

मुंबई | परीक्षा रद्द करा किंवा आम्हांला परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ तरी द्या, अशी मागणी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना केली आहे.

कोरोनामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा जून महिन्यांत ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळत नसल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अजूनही आटोक्यात आलेली नाही. कोरोना काळात रुग्ण तपासणी दरम्यान अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा होते. त्यातून बरे होण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे सध्य स्थितीत आम्हांला कोरोना बाधितांची सेवा करताना किमान ताण न घेता सेवा करता यावी अशी मागणी अंतिम वर्षातील डॉक्टरांनी केली आहे.

दरम्यान,  तीन वर्षांची कामगिरी पाहून आम्हांला श्रेणी द्यावी अशी मागणी अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”

महत्वाच्या बातम्या-

गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More