पुणे | राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेकर, राजर्षी शाहू, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, ग्रंथनिवड समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्याचबरोबर विभागीय मंडळांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. त्या पाठोपाठ आता साहित्य आणि ग्रंथविषयक समित्यांबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम 1967 मध्ये सुधारणा करण्यासाठी आशुतोष देशपांडे, गुलाबराव मगर, सुनील वायाळ, रवींद्र पांडे, प्रा. चंद्रकांत जोशी, डॉ. राजशेखर बालेकर, डॉ. रामेश्वर पवार या सदस्यांचा समावेश असलेली समिती मार्च 2019मध्ये नेमण्यात आली होती.
दरम्यान, जुलैमध्ये या समितीची कार्यकक्षाही वाढवण्यात आली होती. मात्र आता या समितीवरील सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधींची नियुक्ती?
रात्रीच्या अंधारात कसा दिसतो भारत?, पाहा नासानं काढलेला खराखुरा फोटो
महत्वाच्या बातम्या-
दात कोरून पोट भरण्याचे उद्योग; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका
हातात बूट घेऊन देवेंद्र फडणवीस स्टेजवर, रूपाली चाकणकर म्हणतात…
निवडणुकी आधी जे भाजपत गेले त्या सगळ्यांची वाट लागली- धनंजय मुंडे
Comments are closed.