बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी | कॅन्सरग्रस्त 3 वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, रुग्णालयात जल्लोष, पाहा व्हिडीओ

वाराणसी | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागत आहे.

एकीकडे कोरोनामुळे बळी जात असताना वयाची शंभरी पार केलेले तसेच लहान मुलांनी कोरोनाला हरवल्याच्या सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. आता वाराणसीच्या डॉ. होमी भाभा कॅन्सर रुग्णालयात भरती असलेल्या 3 वर्षाच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केली आहे.

रक्ताच्या कर्करोगाने हा मुलगा ग्रासला होता. चिमुकल्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसने आनंद साजरा केला. डॉक्टर आणि नर्स आनंदाने नाचताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चिमुकल्यासोबत आईला देखील कोरोनाची लागण झाली होती. मुलाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जीत जायेगा इंडिया… या गाण्याच्या तालावर डॉक्टर, नर्स यांच्यासह अन्य रुग्णही नाचताना दिसले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील अवघ्या सात महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरवलं होतं. बाळाला कोरोनाची लागण झाली हाेती. त्याच्या छातीमध्ये 15 सें.मी. आकाराचा दुर्मीळ ट्यूमर आढळून आला. या बाळावर परेल येथील वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले होते.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सरपंच राहिलेल्या महिलेला कोणी खांदा न दिल्याने मुलाने….

चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे- अशोक चव्हाण

पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीनं कोरोनाग्रस्तांना केली 1 लाखाची मदत!

काय सांगता! ओम, ओम म्हणत चितेवरच उठून बसला मृतदेह अन्….

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More