माझ्या आईवर कॅन्सर ट्रिटमेंट चालू आहे, तिच्यासाठी प्रार्थना करा- राखी सावंत
मुंबई | बिग बाॅसच्या घरातील फिनालेपर्यंत पोहोचलेली स्पर्धक राखी सावंतनं तिच्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड देत आहे. बिग बाॅसमध्ये तिने तिच्या अनेक समस्यांचा खुलासा केला होता. त्या दरम्यान ती ढोंग करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र मंगळवारी रात्री राखीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या आईला कॅन्सर असून तिच्यासाठी प्रार्थना करा, असं म्हणत फोटो टाकला आहे.
राखी ही बिग बाॅसमध्ये सर्वांना एंटरटेन करणारी एकमेव कंटेस्टंट होती. या दरम्यान तिच्या कामगिरीने तिची टाॅप 5 मध्ये जागा निश्चित झाली होती. मात्र त्यानंतर 14 लाख रुपये घेऊन राखीने शो सोडला. या पैश्यांनी ती आपल्या आईचे उपचार करणार असल्याचं सुद्धा तीने तेव्हा सांगितलं होतं.
बिग बाॅस शो दरम्यान राखीला सपोर्ट करायला आलेल्या बिंदूने राखी शो जिंकू शकत नसून, तिने 14 लाख घेऊन शो सोडावा, असं राखीला सांगितलं होतं, नंतर राखीने तीचं म्हणणं मनावर घेऊन हा शो सोडला.
राखीने शेअर केलेल्या फोटोंना पाहून तीचे फॅन्स खूप भावुक झाले असून काही लोकांनी तिच्या आईसाठी प्रार्थना केली तर काहींनी तीच्या हिंमतीची दाद दिली आहे. व्यक्तिगत आयुष्यात अडचणींना सामोरं जाऊन देखील राखी सगळ्यांचं मनोरंजन करते, अशा शब्दात तीच्या चाहत्यांनी तिचं कैतुक केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सुप्रसिद्ध PK सिनेमाचा सिक्वेल येणार; आमीरच्या जागी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!
‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’; ‘या’ भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले…
“स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?”
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील फोटो!
Comments are closed.