Top News विदेश

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

कॅनडा | सध्या जगभरात कोरोनाला हरवण्यासाठी वेगवेगळ्या लसींवर संशोधन करत आहेत. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्युटची कोविडशिल्ड ही लस देशवासियांना देण्याची प्रकिया चालू झाली आहे. मात्र अशातच गांजाचा वापर करून आपण रूग्णांना वाचवू शकते, असा दावा कॅनडामधील एका विद्यापीठाने केला आहे.

कोरानाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातील आणि गंभीर आजार असणाऱ्यांना वाचवता येऊ शकतं असा दावा केला आहे. या संशोधनानुसार शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती आणखीन सक्षम करण्यासाठी गांजाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं, असं विद्यापीठाच्या अभ्यासात म्हटलं आहे.

कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे की मानवी शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने शरीरामध्ये ‘साइटोकाइन स्टार्म’ नावाची प्रक्रिया सुरु होते. यामुळे शरीरामधील निरोगी पेशींवरही परिणाम होतो.

दरम्यान, गांजाच्या पानांमध्ये आढळणारं तत्व या साइटोकाइन स्टार्मला थांबवू शकतं. साइटोकाइन स्टार्म निर्माण होण्यासाठी इंटरलुकीन-६ आणि ट्युमर नेसरोसीस फॅक्टर अल्फाही दोन रसायनं कारणीभूत असतात. याच रसायनांचे प्रमाण गांजामधील तत्वाच्या मदतीने कमी करता येतं, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी, कधी?’, शिवसेनेचा मोदींना सवाल

“पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…”

‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

“शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायच याचा निर्णय घ्या”

शेवटी जिंकलोच!… मात्र हा व्हिडीओ करोडो भारतीयांच्या काळजाची धडधड वाढवतोय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या