बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ॲमेझॉनवरून चक्क करण्यात येत होती गांजा तस्करी, असा झाला पर्दाफाश

नवी दिल्ली | पोलिसांनी ऑनलाईन गांजाविक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे ही तस्करी चक्क प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनद्वारे करण्यात येत होती. ॲमेझॉनवर कडीपत्ता दाखवून त्याजागी गांजाची विक्री केली जात होती. पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली आहे.

मध्यप्रदेशातील भिंडमध्ये हा सर्व प्रकार सुरू होता. पोलिसांनी शनिवारी या टोळीवर छापा टाकून टोळीचा पर्दाफाश केला. तब्बल 20 किलो अंमली पदार्थ टोळीकडून जप्त करण्यात आले आहेत. टोळीतील 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूणच या प्रकरणामुळे सगळेच हैरान झाले आहेत.

या आरोपींनी गांजा तस्करीसाठी ॲमेझॉनवर बनावट पॅनकार्ड आणि जीएसटी क्रमांकासह नोंदणी केली होती. ॲमेझॉनद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा याशिवाय इतर अनेक भागात गांजाची विक्री केली जात होती. ॲमेझॉनसारख्या प्रसिद्ध शॉपिंग वेबसाईटबाबत असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी ॲमेझाॅन कंपनीकडून अजून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण याबाबत देण्यात आलं नाही. ऑनलाईन गांजा तस्करीच्या अनेक घटना याआधीही अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र, ॲमेझॉनचाच वापर करून या टोळीने गांजा तस्करी केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More