बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंजेक्शन-औषध मिळत नाहीत?, #MahaCovid हॅशटॅग वापरुन एक ट्विट करुन पाहा

मुंबई | कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. मुंबई, पुणे आणि उपनगरात जी छोटी रुग्णालयं आहेत तिथे काही बेड उपलब्ध असू शकतात. पण त्याची माहिती वेळीच मिळतेच लोकांना असं नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर एक नवी मोहीम सुरू केली आहे.

कोरोना संदर्भात बेड, प्लाझ्मा, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह इतर कोणत्याही गोष्टी मिळण्यात तुम्हाला किंवा मित्रमैत्रिणींना अडचण किंवा गरज लागत असेल तर #mahacovid या हॅशटॅगसह जोडायला विसरू नका, असं हे आवाहन ट्विटरवर करण्यात येत आहे. महा म्हणजे महाराष्ट्र या अर्थाने आणि कोव्हिड अर्थातच कोरोना या दोघांच मिळून महाकोव्हिड, असं या नव्या मोहिमेचं नाव ठेवलं आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, समीर विद्वांस, हेमंत ढोमे आदी अनेक कलाकारांनी या मोहिमेत भाग घेतला आहे.

पुढचे काही दिवस मी सोशल मीडियावर माझे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणार नाही. सोशल मीडियाचा वापर आपण करोनाचं युद्ध जिंकण्यासाठी करायला हवा. त्यामुळे काही दिवस एकतर मी सोशल मीडियावर सक्रिय नसेल किंवा असलो तरी त्या पोस्ट करोना संबंधित असतील. कोरोनाची माहिती असले. एखाद्याला मदत हवी असेल तर त्याचं आवाहन असेल. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मी मनोरंजनाच्या पोस्टसाठी वापरणार नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय, असं म्हणतं इन्स्ट्राग्रामवर स्वप्नील जोशीने व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, #mahacovid या हॅशटॅगला ट्विटरवर प्रतिसादही मिळू लागला आहे. या हॅशटॅगमुळे लोकांना त्यांच्या जवळील किती बेड उपलब्ध आहे, याची माहिती देखील कळत आहे. त्यामुळे लोकांना लवकर उपचार मिळण्यास मदत देखील होतं आहे.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या-

‘…हे आम्हाला अजिबात आवडलं नाही’; बाळासाहेब थोरात मित्रपक्षांवर भडकले

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहावेना; सुंदर पिचाई यांनी उचललं मोठं पाऊल!

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More