बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रातील मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?”

औरगांबाद | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमने (AIMIM) औरंगाबाद ते मुंबई अशी तिरंगा रॅली काढली. यावेळी पोलिसांनी रॅली अडवण्याचा प्रयत्न केला. शिवाय पोलिसांनी मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका, असा आदेश दिला. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला संतप्त सवाल विचारला आहे.

यावेळी इम्तियाज जलिल म्हणाले, मुंबईला येताना आम्हाला तिरंगा झेंडा लावू नका, असा आदेश पोलिसांनी दिला. हा आमच्या पक्षाचा झेंडा नाही. आमच्या स्वाभिमानाचा हा झेंडा आहे, असं सुनावत पुढे त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.

यावेळी ते म्हणाले, आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जातोय. मुस्लीम आरक्षणाबाबत काय करताय? वक्फ बोर्डाची 93 हजार एकर जमीन कोणी लाटल्या?  सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या जमिनी हडप केल्यात. हे प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याबद्दल सरकारला प्रश्न विचारण्यासाठी एमआयएमने औरगांबाद ते मुंबई अशी तिरंगा रॅली काढली आहे. एमआयएमला चांदिवली येथील शाळेत सभेला परवानगी मिळाली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन औवेसी हे याठिकाणी सभा घेणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“…तर भाजप आम्हाला लांब नाही”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

फक्त ‘या गोष्टीवर’ बंदी आणा; वानखेडे दांपत्याची न्यायालयात धाव

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका”

पतीला गर्लफ्रेंडसोबत असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं; पत्नीनं भररस्त्यात दोघांना…

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More