काळजी घ्या! डायबेटिसबाबत अभ्यासातून मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | जगात डायबेटिस (Diabetes) च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबात एखादा तरी पेेशंट डायबेटिस असणारा असतो. जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत देश येतो. जेथे डायबेटिस रुग्णांची संख्या जास्त आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (World Health Organization)भारतात 77 लाख डायबेटिसच्या केसेस आहेत. डायबेटिस होण्यामागची अनेक कारणं आहेत. सध्याची बदलेली लाइफस्टाइल हे एक महत्त्वाचं कारण आहे. या मध्ये टाईप-1 आणि टाईप-2 असे प्रकार आढळतात.

डायबेटिस च्या संबंधित अनेक रिसर्च (Research) वारंवार केले जातात. नुकताच एक रिसर्च करण्यात आला आहे. जवळजवळ 1 हजार लोकांवर हा रिसर्च करण्यात आला आहे. त्या रिसर्चमध्ये रात्री झोप ने येणं हे देखील डायबेटीज झाल्याचं लक्षण असू शकतं, असं सांगण्यात येत आहे.

जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला टाईप-2 चा डायबेटीज झाला आहे. या रिसर्चनुसार ज्यांना रात्री झोपण्याची समस्या आहे. त्यांच्यामध्ये इंफ्लामेंटरी मार्कर (Inflammatory markers) आणि वजन वाढण्याच्या समस्या दिसून आल्या आहेत. जे डायबेटीजच्या टाईप-2 शी संबधित आहे.

हा रिसर्च ऑस्ट्रेलियातील (Australia) लोकांसोबत करण्यात आला. ज्यांच्यावर हा रिसर्च करण्यात आला ते सगळे 45 वयापर्यंतचे होते. ज्या लोकांना रात्री झोपण्याची समस्या आहे. त्यांना अतिवजन, कोलेस्ट्राॅल या सारख्या समस्या दिसून आल्या. ज्यामुळे डायबेटीजच्या टाईप-2 ची समस्या वाढू शकते.

रिसर्चनुसार ज्या लोकांना पूर्वीपासूनच डायबेटीसची चिंता आहे आणि ज्यांना झोपेचा त्रास होतो. त्यांच्या शरीरात इतर रोगांचा प्रभाव जास्त वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी सर्व लोकांनी आणि खास करुन रुग्णांनी सात तास झोप घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या