बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रात मंत्रिमंडळात लॉटरी लागण्याची शक्यता, लवकरच घेणार मोदींची भेट”

नवी दिल्ली | पंजाब काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठी खलबत पाहायला मिळत आहेत. अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांणा उधाण आलं होतं.  त्यामुळे पंजाबचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते हरजीत गरेवाल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. त्यानंतर त्यांना केंद्रात कृषिमंत्रिपद देण्यात येऊ शकतं. कॅप्टन कोणती भूमिका बजावणार याचा निर्णय त्यांनी स्वत: घ्यायचा आहे. त्यांची भूमिका इतर कोणी ठरवू शकत नाही, असं हरजीत गरेवाल यांनी म्हटलं आहे.

अमरिंदर सिंग यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अमरिंदर सिंग भाजपचं कमळ हाती घेणार का?, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.

दरम्यान, जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या पदावर असण्याचा काय फायदा, अशी प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

थोडक्यात बातम्या- 

कडक सॅल्यूट! एकही सुट्टी न घेता 8 महिन्यात केलं तब्बल 61 हजार जणांचं लसीकरण

“सरकारने एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं”

“राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही”

मद्यप्रेमींचा हिरमुड! ‘या’ ठिकाणी तब्बल 45 दिवस दारूची दुकानं बंद राहणार

शिवलीला पाटील बिग बॅासमधून बाहेर, समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More