बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

नवी दिल्ली | पंजाबमधील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा दिल्याचं समजत आहे. याबाबत त्यांचे पुत्र रनिंदर सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आपल्या पक्षामधील सतत असंतोषामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं रनिंदर सिंह यांनी म्हंटल आहे.

मी माझ्या वडिलांबरोबर राजभवनात जात आहे. माझे वडील राज्यपालांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपुर्द करतील. आम्ही सर्वच कुटुंबीय एक नवी सुरुवात करू, असंही कॅप्टन अमरिंदर यांचे चिरंजीव रनिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

शनिवारी पंजाबच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र त्या अगोदरच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी राजभवन गाठून राजीनामा पत्र सादर केल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्या खांद्यावर द्यावी अशी मागणी अनेकांनी केल्यानं त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

भाजपमधून बाहेर पडत सन्यास घेतो म्हणणाऱ्या बाबुल सुप्रियोंचा तृणमूलमध्ये प्रवेश!

शिवसेेनेसोबतच्या युतीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

“2.5 कोटींहून अधिक लसीकरण झालं, मात्र अचानक एका राजकीय पक्षाला रिअॅक्शन झाली”

सलग दुसऱ्या दिवशीही अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची छापेमारी

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ, आणखी दोन दिवस रहावं लागणार कोठडीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More