बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

नवी दिल्ली | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. येत्या निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे  काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ‘नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली होती. राजीनामा दिल्यावर अमरिंदर सिंग यांनी ‘नवज्योत सिंग सिद्धूंवर गंभीर आरोप केले आहेत.

नवज्योतसिंग सिद्धू एक अक्षम माणूस आहे. तो एक आपत्ती ठरणार आहे. पुढील मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी मी त्यांच्या नावाला विरोध करेल. त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे आणि हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असेल, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचे मित्र आहेत. त्यासोबतच लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही संबंध आहेत, असं अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. राज्यापालांकडे राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच अमरिंदर सिंग यांनी सिद्धूंवर आरोेप केले आहेत.

दरम्यान, माझ्या नेतृत्वावर शंका घेण्यात आली. मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. साडेनऊ वर्ष मी मुख्यमंत्रिपदी होतो आता योग्य वेळ येईल तेव्हा राजकीय भविष्याचा निर्णय घेईल, असं सूचक वक्तव्य अमरिंदर सिंग यांनी केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘हे’ पाच महारथी आघाडीवर, जाणून घ्या!

पुणे कोरोना अपडेट, वाचा आजची आकडेवारी!

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी अफगाण मुलींबाबत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

धक्कादायक! महिलेच्या गळ्यात अडकली कोरोना चाचणीच्या कीटमधील कांडी, त्यानंतर….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More