बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. येत्या निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपर्द केला. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

माझ्या नेतृत्वावर शंका घेण्यात आली. मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. दोन महिन्यात तीनदा आमदारांना बोलावण्यात आलं. ज्यांच्यावर पक्षनेतृत्वाला विश्वास त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात येईल, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

राजकीय भवितव्याचा विचार केला जाईल. माझे पाठीराखे, समर्थक यांच्याशी बोलेल. साडेनऊ वर्ष मी मुख्यमंत्रिपदी होतो आता योग्य वेळ येईल तेव्हा राजकीय भविष्याचा निर्णय घेईल, असं सूचक वक्तव्य कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. त्यांच्या या गुगलीमुळे राजकीय वर्तुळात अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, राजीमाना दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग कोणत्या पक्षात जाणार?, आपला स्वत: चा नवीन पक्ष स्थापन करणार?, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. कारण पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदर सिंग कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-  

‘आजकालचे क्रिकेटपटू कोणताही मोठा निर्णय….’; विराटच्या कर्णधारपद सोडण्यावरून कपिल देव संतापले!

‘आपण भूतकाळ बदलू शकत नसलो तरी…’; शिल्पाने राज कुंद्रासोबतच्या नात्याबाबत दिले संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

भाजपला मोठा धक्का, राजकीय संन्यास घेतो म्हणणारे बाबूल सुप्रियो तृणमूलमध्ये!

शिवसेेनेसोबतच्या युतीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More