Top News खेळ

रनआऊट दिल्याच्या निर्णयावर कर्णधार अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया, म्हणाला…

मेलबर्न | टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शांत तसंच संयमी खेळाचा पुन्हा एकदा परियच आलाय. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत आजिंक्य रहाणे रनआऊट दिल्यानंतर वादही निर्माण झाला. यावर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर रनआऊटच्या मुद्द्यावर रहाणेने भाष्य केलंय.

कर्णधार रहाणे म्हणतो, “मी रनआऊट होतो किंवा नव्हतो हा वाद महत्त्वाचा नाहीये. मला आऊट दिलं हे महत्त्वाचं आहे. मात्र मी या गोष्टीचा जास्त विचार करत नाहीये.”

रहाणेला रनाआऊट दिल्याच्या अंपायरच्या निर्णयावर चाहत्यांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केलीये. यावेळी अनेकांनी पेन आणि रहाणे यांच्या रनआऊटचे फोटो आणि व्हिडीयो पोस्ट करत नाराजी दर्शवलीये.

दरम्या रहाणेने या सामन्यात संघाने केलेल्या कामगिरीचं कौतुकंही केलं आहे. गोलंदाजांनी त्यांची भूमिका योग्य आणि चोख पद्धतीने पार पाडल्याचं त्याने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे

पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!

“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या