बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं, मोदी सर्वांचा सन्मान करतात”

नवी दिल्ली | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी शनिवारी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर काॅंग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे सध्या पंजाबच्या राजकारणाची देशात जोरदार चर्चा चालू आहे. अशातच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमरिंदर सिंग यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे देशात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये यावं. मोदी सर्वांचा सन्मान करतात, असं रामदास आठवले म्हणाले. त्यामुळे अमरिंदर सिंग यावर काय प्रतिक्रिया देणार. ते आता पाहावं लागणार आहे.

चरणजीत सिंग चन्नी यांनी आज राजभवानात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन आपलं मत व्यक्त केलं. हायकमांडने एका सामान्य माणसाच्या हाती मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली आहे. ज्याच्या घराला कधी काळी छत नव्हतं. आज काॅंग्रेसने त्याला मुख्यमंत्री बनवलं आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना काॅंग्रेस नेत्यांवर आरोप केले आहेत. ही माझी शेवटची राजकीय लढाई आहे. त्यामुळे या लढाईत मी शेवटपर्यंत लढणार आहे असं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग पूढे काय भूमिका घेणार हे आता पाहाव लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

चिमुकलीला पाण्यात बुडताना पाहून कुत्र्याने…; व्हिडीओ व्हायरल

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

चंद्रकांत पाटील म्हणजे महाराष्ट्राला पटलेलं गोड स्वप्न- रूपाली चाकणकर

किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली?, गृहमंत्री म्हणाले…

“बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शुन्यापेक्षाही कमी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More