बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मोठा निर्णय; राजकारणात नवं समीकरण दिसणार?

चंदीगड | पंजाबच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलेले कॅप्टन अमरिंदर सिंह हे नाराज असल्याचंही बोललं जात होतं. काँग्रेस हायकमांडच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर नाराज होत अमरिंदर सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आता स्वत:चा स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचं निश्चित केलं आहे. ते आता नवीन पक्ष काढणार आहेत. पण या पक्षाचं नाव काय असेल आणि इतर गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. पण या पक्षाच्या स्थापनेमुळे राजकारणातील समीकरणं बदलून नवं काही उदयाला येणार का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंजाबची सुत्रं सध्या चरणजित सिंह चन्नी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरावं लागणारे अमरिंदर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता ते स्वतंत्र पक्ष काढणार असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा पक्ष पुर्ण ताकदीने पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वच जागांवर लढत देणार असल्याचं बोललं जात आहे.

सध्या तरी हा पक्ष भाजपशी हातमिळवणी करू शकतो, अशा चर्चांना उधाण आलं आहे. पण येत्या काळात या पक्षाच्या ध्येय धोरणांबद्दल आणि एकूणच रणनितीबद्दल आणखी स्पष्टता येईल. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला नुकसान होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“कासवाला सुद्धा लाज वाटेल, अशा गतीने ठाकरे सरकार काम करतंय”

“त्यात काहीच तथ्य नाही; आर्यन खान निर्दोष, त्याला गोवलं जातंय”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

“आरोप सिद्ध झाल्यास मी राजीनामा देतो, नाहीतर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More