मोदींचं ते वक्तव्य तुच्छ, माझा पक्षनेतृत्वावर विश्वास!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ते वक्तव्य तुच्छ आहे, माझा पक्षनेतृत्त्वावर विश्वास आहे, असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. 

पूर्वोत्तर राज्यात भाजपला विक्रमी जागा मिळाल्यानंतर भाजप मुख्यालयात बोलताना मोदींनी कॅप्टन अमरिंदर यांच्यावर निशाणा साधला होता. पक्ष त्यांना आपलं मानत नाही, ते म्हणजे स्वतंत्र सैनिक आहेत, असं मोदींनी म्हटलं होतं. 

दरम्यान, तुम्हाला हे कोणी सांगितलं. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना तुम्हाला हे सांगितलं का? माझा माझ्या पक्षनेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. माझ्यात आणि माझ्या पक्षात दरी निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी नाही होणार, असं कॅप्टन अमरिंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.