सिगारेट पेटवायला माचीस न दिल्यानं कॅप्टन बालींची हत्या

पुणे | सिगारेट पेटवायला माचीस न दिल्यानं कॅप्टन बालींची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. याप्रकरणी रॉबीन अँथोनी लाझरस या 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. 

रॉबीन बीपीओ सेंटरमध्ये काम करतो. 1 फेब्रुवारीच्या रात्री दारुच्या नशेत तो आपल्या मोटार सायकलवरुन चालला होता. कॅम्प भागात त्याची मोटारसायकल बंद पडली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला तंबूत राहणाऱ्या कॅप्टन बाली यांच्याकडे त्याने सिगारेट पेटवण्यासाठी माचीस मागितली. 

माचीस देण्यास बालींनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रॉबीनने रस्त्याच्या कडेला पडलेली सिमेंटची वीट त्यांच्या डोक्यात टाकली. त्यातच त्यांचा करुण अंत झाला.