बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्णधार कोहलीच! कर्णधारपदाच्या संभाव्य चर्चेवर बीसीसीआयचं स्पष्टीकरण

मुंबई | तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या दबावामुळे कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्यानं भारतीय क्रिकेट संघाचा व्हाईट बॉल कॅप्टन रोहित शर्मा असेल, अशी चर्चा क्रिकेटविश्वात रंगली होती. त्यावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

क्रिकेटविश्वास रंगत असलेल्या सगळ्या चर्चा खोट्या आहेत. असं काहीही केलं जाणार नाही. ही फक्त माध्यमांमध्ये सुरु असलेली चर्चा आहे. या मुद्द्यावर बीसीसीआयची कोणतीही बैठक वा चर्चा झालेली नाही. विराटच सगळ्या फॉरमॅटसाठीचा कॅप्टन असेल, असं बीसीसीआयचे खजीनदार अरूण धुमाळ यांनी सांगितलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट काही खास प्रदर्शन करू शकला नाही. त्याआधी देखील त्याचा प्रदर्शन खराब राहिलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विराट चिंतेत होता. त्यामुळे त्याने सचिन तेंडुलकरकडे सल्ला देखील मागितला होता.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर आता संघाचं कर्णधार विराट कोहलीकडेच राहणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

गडकरींची टोलेबाजी! “आमदारांना मंत्री न झाल्याचं दु:ख आहे तर, मंत्र्यांना…”

मुलींना शिक्षण देण्यास तालिबानची परवानगी; मात्र घातल्या ‘या’ जाचक अटी

“अहो राऊत, तुम्ही कधीपासून मुंबईचे पोलीस आयुक्त झालात?”

भारताविरूद्ध पाकिस्तानची रणनीती! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

‘…पण ठाकरे सरकारने विश्वासघात केला’; भाजपची घणाघाती टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More