बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कॅप्टन कूल धोनी’ घेणार आयपीएलमधून निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार अखेरचा सामना

मुंबई | महेंद्रसिंग धोनी अनेक क्रिकेट चाहत्यांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू आहे. जगातील एक महान आणि यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंग धोनीची ख्याती आहे. आता 40 वर्षीय धोनीने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.आयपीएलमधील चैन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निवृत्तीची घोषणा करताना शेवटचा सामना कधी खेळणार आहे हे स्पष्ट केले आहे.

सन 2022 मध्ये आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे, अशी घोषणा महेंद्रसिंग धोनीने केली आहे. यावेळी एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना ‘निरोपाचा शेवटचा सामना पाहण्याची संधी चाहत्यांना नक्की मिळेलं’, असं महेंद्रसिंग धोनीने म्हटलं आहे. तसेच आयपीएल 2022 च्या हंगामात चेपॉक स्टेडीयम वर क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने मी माझा अखेरचा सामना खेळणार आहे ,असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला आहे.

कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने चैन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत तीनवेळा आयपीलमध्ये जेतेपद मिळवून दिलं आहे. महेंद्रसिंग धोनीची ओळख आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार अशी देखील आहे. त्याने आतापर्यंत चेन्नई संघाला अनेकदा फायनलमध्ये पोहचवलं आहे. मात्र, त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्त्व करतो. तर दोन वर्ष त्याने रायझिंग पुणे सुपरजायंटचं देखील नेतृत्व केलं आहे. तर सध्या चालू असलेल्या आयपीएल हंगामात धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने बाद फेरीत प्रवेश केला आहे. महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद कोणत्या खेळाडूकडे जातयं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“चुलीत गेलं ते राजकारण…उद्याच राजीनामा फेकतो, मला त्याची गरज नाही”

‘आम्ही त्याला पकडलं नाही फक्त त्याच्यासोबत…’; मलिकांच्या आरोपांवर भानुशालींचं प्रत्युत्तर

मान्सून हंगाम संपला! ‘या’ भागातून अखेर परतीच्या प्रवासाला सुरूवात

येत्या 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’; ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून बंदची हाक

यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ दोन संशोधकांना जाहीर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More