खेळ

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार ठरला, आता ‘हा’ दिग्गज सांभाळणार धुरा

मुंबई | आयपीएलच्या नव्या हंगामाची सगळ्यांनाच चांगली ओढ लागली आहे. कारण नव्या संघांसह काही खेळाडूंची अदलाबदली देखील होणार आहे. अशातच काही संघ आपले कर्णधार देखील बदलणार आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने देखील यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू स्टिव्ह स्मिथ आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणार आहे. राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सला दिल्यामुळे राजस्थानचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.  स्टिव्ह स्मिथच्या निवडीने हा प्रश्न निकाली निघाला आहे.

राजस्थानचे प्रमुख प्रशिक्षक अँड्रू मॅक्डोनाल्ड यांनी यासंदर्भात माहिती दिली. अजिंक्य रहाणे गेल्यानंतर कर्णधारपदासाठी स्टिव्ह स्मिथ हा एकमेव पर्याय आहे. मात्र आगामी हंगामासाठी संघात स्थैर्य असणं गरजेचं आहे. खेळाडूंना नेमकं काय हवंय याची त्याला जाण आहे, तो अनुभवी आहे, असं ते म्हणाले.

बाराव्या हंगामात स्मिथनेच राजस्थानचं नेतृत्व केलं होतं. तेराव्या हंगामात मात्र त्याच्याकडून ही जबाबदारी काढून अजिंक्य रहाणेला देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व स्मिथच्या हातात आलं आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या