पुणे महाराष्ट्र

माणुसकी मेली?; पोलिसाला धडक देऊन ‘तो’ थांबला नाही

पुणे |  जगभरासह राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशासह आपल्या राज्यातही कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाविरूद्धच्या या लढाईत आपले पोलीस खात आणि वैद्यकीय अधिकारी मोठ्या हिमतीने लढत आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस वारंवर नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन करत आहेत. मात्र बारामतीमध्ये कर्तव्य बजावून घरी परतत असणाऱ्या एका पोलिसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी पोलीस कर्मचारी एम.डी पवार हे बंदोबस्तावर होते. सायंकाळी साडेसात वाजता शहरातील बंदोबस्त आटोपून आपल्या मोटारसायकल वरून घरी जात असताना, जळोची-लाकडी रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव कारने पवार यांना समोरासमोर धडक दिली. या अपघातात एम.डी पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी पोलीस वर्दीतील जखमी पवार यांना बारामतीच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. परंतु डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकला हलवण्यात आलं आहे. लाकडी-जळोची रस्त्यावर हा घटना घडली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री, गावचे सरपंच, पोलीस अधिकारी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. मात्र लोक काही ऐकत नाहीत. आता तो वाहनचालक बाहेर कोणत्या कारणाने पडला होता?, तो कोण होता?, यासंबंधी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

महत्वाच्या बातम्या-

हॉटस्पॉट वगळता 4 मे रोजी लॉकडाऊन उठणार? रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक मात्र बंद राहणार?

“नागरिकांनो घाबरू नका, आतापर्यंत 1282 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झालेत!”

राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार- परिवहन मंत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या