Car Offer July 2024 | भारतात जगातील सर्वात मोठी चार चाकी वाहनांची बाजारपेठ आहे. भारत देश हा चार चाकी वाहनांसाठी जगात तीन क्रमांकावर आहे. देशात छोट्या कारला मागे टाकून विक्रेते हे मोठ्या एसयुव्ही वाहनांची खरेदी करण्यावर लक्ष केंद्रीत करत असतात. कमी विक्रीमुळे कंपन्या चिंतेत आहेत. त्यांना उत्पादित कारचा स्टॉक क्लिअर करायचा आहे. यासाठी आता चार चाकी वाहनांच्या कंपन्यांनी जुलै महिन्यात सवलतीचा पाऊस पाडणार असल्याची शक्यता आहे. (Car Offer July 2024)
एसयुव्ही कारवर बंपर डिस्काऊंट
चारचाकी वाहनांची गेल्या काही दिवसांपासून विक्री झाली नाही यामुळे वाहनांचा स्टॉक वाढत चालला आहे. यामुळे आता त्याची चिंता आहे. मारुती सुझुकी ब्रिझा, ग्रँड व्हिटारा, होंडा एलिव्हेट यासारख्या लोकप्रिय एसयुव्हीवर बंपर डिस्काऊंट देण्यात येणार आहे. महिंद्रा XUV700 आणि टाटा हॅरियर, सफारी सारख्या दमदार आणि लोकप्रिय एसयुव्हीच्या दरांमध्ये घट करण्यात आली आहे. (Car Offer July 2024)
कार डिलर्स सध्या संकटात आहेत. गेल्या 65-67 दिवसांपासून कार विक्रीच्या आकड्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता कार कंपन्या चर्चेत असल्याचं दिसून आलं आहे. चारचाकी वाहनांच्या कंपन्यांना आपल्या चारचाकी वाहनांचे स्टॉक लवकरात लवकर कमी करायचा आहे. (Car Offer July 2024)
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी आता डिस्काऊंट ऑफरचा भडिमार केला आहे. चारचाकी वाहनांच्या मूळ किंमतीत जर सूट दिली तर याचा फायदा हा खरेदीदारांना आणि कार कंपन्यांना देखील होईल. (Car Offer July 2024)
कारच्या किंमतीत एवढ्या पटीने सूट
टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या लोकप्रिय एसयुव्हीच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. टाटा हॅरियर आणि सफारी या वाहनांच्या काही मॉडेल्सचा भाव हा 50,000 रुपये ते 70,000 रूपयांपर्यंत कमी झाला आहे. महिंद्रा कंपनीने पण XUV700 ची किंमत कमी करण्यात आली आहे. आता ही कार दोन लाखांपर्यंत कमी स्वस्त झाली आहे.
मारुती सुझुकीने एरिना आणि नेक्सा डिलरशीपच्या कारवर 15,000 रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. एक्सटर नाईटवर 10,000 रुपये आणि स्टँडर्ड Exter वर 20,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. Tucson, अल्काजार, व्हेन्यू सारख्या काही मॉडल्सवर 2 लाखांपर्यंत स्वस्त मिळत आहे. XUV700 च्या व्हेरिएंट्स आधारावर फायदा मिळेल.
News Title – Car Offer July 2024 News Update
महत्त्वाच्या बातम्या
आज ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार, पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार
शहाजीबापू रुग्णालयात तर गणपत गायकवाड जेलमध्ये; महायुतीचं मतांचं गणित बिघडणार?
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; कुणाची विकेट पडणार?
कतरिना कैफ होणार आई?, सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
शत्रुघ्न सिन्हा यांना लाडक्या जावयाकडून मिळालं मोठं सरप्राईज!