मायलेजला ‘बाप’ गाडी, एका लिटरमध्ये 33 किलोमीटर धावते

मुंबई | सध्या सुझुकीच्या(Suzuki) अनेक गाड्या बाजारात धुमाकुळ घालत आहेत. अनेक नवनवीन गाड्या बाजारात लाॅन्च होत असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशीच एक सुझुकीची भन्नाट कार बाजारात आली आहे. मारुती सुुझुकीची हचबॅक अल्टो K10 ची सीएनजी आवृत्ती बाजारात आली आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार ही गाडी मायलेजला 33.85 किमी प्रति किलो आहे. तर सध्याची Alto K10 पेट्रोल (Petrol)मॅन्युअल प्रकारात 24.39 Kmpl ची मायलेज देते.

या CNG किटमध्ये Alto K10 CNG ला 1.0 लिटर ड्युअलजेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिन मिळत आहे. या गाडीची किंमत 5.94 लाख आहे.

यासोबत येणाऱ्या फिचर्स (Features) देखील भन्नाट आहेत. 2 स्पीकर,सेंट्रल लाॅकिंग (Central locking), AUX आणि USM पोर्टस् आणि फ्रंट पाॅवर विंडो, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 2 स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम यासारखी वैशिष्ट्य या कारमध्ये आहेत. Alto K10 CNG ही सुझुकीची सगळ्यात जास्त विक्री होणारी कार आहे.

18 ऑगस्टला कंपनीने ची Alto CNG K10 गाडी लाॅन्च केली आहे. ही कार जुन्या अल्टोपेक्षा मोठी आहे. Alto CNG K10चे इंजिन (engine) 995cc चे आहे. या नवीन Alto K10 CNG ची लांबी 3,530 मिमि, रुंदी 1,490 मिमी आणि उंची 1,520 मिमी आहे. व्हीलबेसबद्दल (wheelbase) बोलायचं झाल्यास लांबी 2.380 मिमी आणि वजन 1,150 किलो आहे.

महत्वाच्या बातम्या