बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निष्काळजीपणा! कामावर डॉक्टर न आल्यामुळे 12 कोरोना रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

दिसपूर | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळाला. पण आता हळूहळू दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही आटोक्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत असल्याच्या घटना पाहिला मिळत आहे.

अशीच काहीशी घटना सध्या आसाममधील गुवाहाटीमध्ये घडल्याचे समोर येत आहे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर डॉक्टर नसल्यामुळे 12 कोरोना संसर्ग झालेल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. रात्रपाळीला अनेकदा डॉक्टर ड्युटीवर येतच नाहीत, असा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

आॅक्सिजन सपोर्ट देऊनही त्यांची आॅक्सिजन पातळी वाढत नव्हती. तसेच काही रुग्णांना एकापेक्षा अधिक व्याधी झालेल्या होत्या. त्याचबरोबर कुणीही कोरोनाचा एकही डोस घेतला नव्हता, अशी सारवासारव जीएमसीएचचे डीन अभिजित सरमा यांनी केली.

दरम्यान, कोरोनाबाधित 12 रुग्णांपैकी 9 रुग्ण आयसीयूमध्ये होते, तर तीन रुग्ण कोव्हिड वॉर्डमध्ये होते. त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती, असं जीएमसीएचचे डीन अभिजित सरमा यांनी सांगितलं. या रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली, तेव्हा डॉक्टर ड्युटीवर उपस्थित नव्हते, असं रूग्णाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत”‘

रणवीर सिंहचा नवीन लूक पाहून चाहते झाले सैराट, पाहा फोटो

आज सोनं तब्बल 460 रुपयांनी घसरलं, तर चांदी देखील उतरली; वाचा ताजे दर

कोरोनाकाळात ‘या’ शहरातील खासगी रुग्णालयाविरूध्द तब्बल 580 तक्रारी, 496 लागल्या निकाली

ज्येष्ठ अभिनेता पद्मश्री नसीरुद्दीन शहा यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More