बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

18 नाही तर आता ‘इतक्या’ वर्षापर्यंत करावा लागणार मुलाचा सांभाळ; सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | मुलाचा सांभाळ 18 वर्षापर्यंत नाही तर पदवी होईपर्यंत करावा लागेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केला आहे. कुटुंब न्यायालयाच्या आदेशात हा बदल करण्यात आला असून न्यायमुर्ती डीवाय चंद्रचूड आणि एमआर शहा यांच्या खंडपीठानं हा बदल केला आहे.

सर्वोच्च न्यायलयामध्ये आलेल्या या घटनेमध्ये कर्नाटकच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचे इतर कोणासोबत तरी संबंध होते. या कारणामुळे त्यांच्यात 2015 मध्ये घटस्पोट झाला. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने दुसरं लग्न देखील केलं. मात्र 2017 मध्ये कुटुंब न्यायलयाने पहिल्या पत्नीसोबत असलेल्या मुलाच्या संभाळासाठी महिना 20 हजार रुपये देण्याचा आदेश कर्मचाऱ्याला दिला होता.

यानंतर कर्मचाऱ्याने उच्च न्यायलयाकडे धाव घेतली. मात्र तिथं त्याला कसलाच दिलासा न भेटल्यामुळे त्यानं सर्वोच्च न्यायलयाकडे हे प्रकरण आणलं. मात्र न्यू बेसिक एज्यूकेशन कारारांतर्गत सध्याच्या काळात 18 वर्षापर्यंत सांभाळ करणं पुरेसं नाही कारण बेसीक पदवी ही काॅलेज पुर्ण झाल्यानंतरच मिळते, असं सर्वोच्च न्यायलयाने म्हटलं आहे. यादरम्यान पत्नीचे बाहेर संबंध असल्यामुळे घटस्पोट झाल्याचं कर्मचाऱ्याच्या वकीलानं सांगितल्यावर कर्मचाऱ्यानी दुसरं लग्न केलं तरी पहिल्या मुलाचा सांभाळ करावा लागतो हे तुम्हाला माहित असेल?, असा सवाल सर्वोच्च न्यायलयाकडून करण्यात आला.

दरम्यान, त्यांना जी आर्थिक मदत करायची आहे ती थोडी कमी केल्यास हरकत नसून ही मदत मुलगा पदवीधर होईपर्यंत करण्यात यावी, असं महिलेच्या वकीलानं न्यायलयासमोर म्हटलं. यावर हा मार्ग योग्य असल्याचं म्हणत मुलाला महिना 10 हजार रुपये देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायलयाने कर्मचाऱ्याला दिला. तसेच वर्षाच्या प्रत्येक सुरवातीला यात 1 रुपयाची वाढ होईल, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द खरा करून दाखवला

वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More