ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं निधन

पुणे | ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी वृद्धापकाळानं निधन झालं. पुण्यातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मंगेश तेंडुलकर यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, मंगेश तेंडुलकर यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून राजकीय विषयांसोबतच सामाजिक विषयांवरही भाष्य केलं. वाहनचालकांनी नियम पाळावेत यासाठी त्यांनी राबवलेली मोहीम उल्लेखनीय होती.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या