बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झालेत. गुरुवारी पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर सडकून टीका केली.

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी तसंच गर्दी केल्याप्रकरणी पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

आंदोलनावेळी गोपीचंद पडळकर यांनी रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणबाजी केली. सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी न जमवण्याचं आवाहन पोलिस आणि प्रशासन करत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. याच पार्श्वभूमीवर कलम 188 नुसार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू

संजना नाही तर आता ‘या’ माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव

मी मराठा म्हणून बोलत नाही; जगात जात हा प्रकार नसता तर…- उदयनराजे भोसले

“वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होते”

चेअरमन, सोसायटीवर लक्ष ठेवा, अन्यथा…; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीच्या आयुक्तांचा महत्त्वाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More