Top News बीड महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

बीड | 25 आक्टोंबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच त्यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरगाव येथे रविवारी पार पडलेला दसऱ्या मेळावा मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत योजन्यात आले होते. मात्र तरीही पंकजा मुंडे यांच्या अनेक समर्थकांनी यावेळी गर्दी केली होती.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. त्यांनतर त्यांनी भगवान गडावर पुजा-आर्चना केली आणि त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, दसरा मेळाव्याला कोणीही येऊ नये, असं मी सांगितले आहे. परंतु ऑनलाईन मेळावा असतानाही बरेच लोक आले आहे. मेळाव्याला हेलिकॉप्टरनं येण्याची परंपरा होती, पण कोरोनामुळे हेलिकॉप्टरएवजी गाडीनं आले असल्याेचे पकंजा मुंडे यांनी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो; आशिष शेलार यांची टीका

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या