बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | सध्या पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. याधीही किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात पुन्हा चौकशी होणार असल्याचं कळतंय.

चित्र वाघ पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. यादरम्यान चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप

‘माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून…’; कंगणाची हृतिक रोशनवर बोचरी टीका

‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ

खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पठ्ठ्यानं पेट्रोल पंपावर भरलं डिझेल अन् केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More