बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, शरद पवारांवरील टीका अंगलट

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) अडचणीत सापडली आहे. लबाडाचा लबाड, तूला ब्राम्हणांचा मत्सर, तू तर मच्छर अशा खालच्या शब्दात केतकी चितळेने शरद पवारांवर टीका केली होती.

शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर केतकी चितळे चांगलीच ट्रोल होत आहे. शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादीचे पदाधाकारी स्वप्निल नेटके यांनी केतकी चितळे विरोधात गु्न्हा दाखल केला आहे. नेटके यांनी केतकीविरोधात कळवा पोलीस ठाण्यात कलम 500, 501, 503 A आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून केतकीला अटक होण्याची शक्यता आहे. केतकीनं शरद पवारांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केली असल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून केतकी घराघरात पोहोचली होती. शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हरामखोर विकृती, मनोरूग्ण तुला चपलेने मारून…’; पवारांवरील आक्षेपार्ह टीकेनंतर रूपाली ठोंबरे आक्रमक

‘तू तर लबाडांचा लबाड…’; अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांवर टीका, वादग्रस्त पोस्ट चर्चेत

27 मे रोजी ‘या’ भागात मान्सूनचं आगमन, हवामान खात्याचा इशारा

महत्त्वाची बातमी ! डी गँग संदर्भात NIA च्या तपासात धक्कादायक खुलासा

धक्कादायक ! वाढदिवसाच्या दिवशीच ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More