बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांमुळे किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

किरीट सोमय्या, नील सोमय्या व ईतर काही जणांवर ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले (Baban Bhosle) यांनी बुधवारी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात जाऊन ही तक्रार दाखल केली आहे.

संजय राऊत यांनी सोमय्यावर आरोप करत ,आयएनएस विक्रांत फाईल, उघड केली. संजय राऊत यांचे भाऊ व आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी बबन भोसले व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह अप्पर पोलिस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आयएनएस विक्रांत (INS Vikrant) ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा करण्यात आलेल्या निधीत कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्यावर करण्यात आला आहे. सोमय्या पिता-पुत्रांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना नेते संजय राऊतांना बोलण्यापासून रोखलं; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री; मुंबईत आढळला पहिला रूग्ण

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा सविस्तर

“संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय होती?”, शरद पवारांचा रोखठोक सवाल

“गांधींबद्दल जे काही बोललो त्याचा…”, कालीचरण महाराज पुन्हा बरळले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More