बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांचा झटका

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतील. राज्यातील वातावरण तापलं असताना राज ठाकरेंनी औरंगाबाद सभेत भोंग्याविरोधातील आंदोलनावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला.

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी काही शर्ती-अटींसह परवानगी दिली होती. मात्र, महाराष्ट्र दिनी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषण करून सभेसाठी दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचा राज ठाकरेंवर आरोप आहे.

राज ठाकरे यांच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यासह शिवाजी पार्क पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंविरोधात दाखल झालेले गुन्हे जामिनपात्र असून राज ठाकरेंना पोलीस ठाण्यात जामीन द्यावा लागेल. तसेच या सर्व गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असून पोलीस राज ठाकरेंना नोटीस देऊन तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देऊ शकतात.

दरम्यान, जनसमुदायाला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, चिथावणी दिल्याबद्दल, गुन्हा करण्यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल तसेच जनसमुदायाला दंगल करण्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल राज ठाकरेंविरोधात 116, 117 व 153 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुझ्यात जीव रंगला’! अखेर अक्षया आणि हार्दिकचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

“मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून…”; इम्तियाज जलील यांची जहरी टीका

मुंबई पोलिसांकडून ‘इतक्या’ मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी

‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही’; राज ठाकरेंचा पुन्हा गंभीर इशारा

”…त्यासाठी कुणाच्याही परवानगीची वाट पाहू नका’; मुख्यमंत्र्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More