मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यात उत्तर सभा घेत चांगलीच खळबळ उडवून दिली. राज ठाकरेंच्या भाषणाची सगळीकडेच चर्चा सुरू असताना राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर सभेत तलवार दाखवणं राज ठाकरेंच्या अंगलट आलं आहे. म्यानातून तलवार बाहेर काढून उंचावल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर सभेतील भाषणापूर्वी राज ठाकरेंचा ठाण्यातील पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना तलवारही भेट दिली. यानंतर राज ठाकरेंनी ती तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली.
दरम्यान, याच प्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून केलेल्या टीकेला राष्ट्रवादीतील (NCP) नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं असताना आता राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
थोडक्यात बातम्या-
“राजसाहेबांचं आजचं भाषण बाळासाहेबांची आठवण करून देणारं”
‘काळजी घे, दगदग करू नको’; पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट
“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे एंटरटेनमेंट, सिनेमात असतं तसं”
‘धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका नाही तर…’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
…अन् महिला चक्क topless होऊन मैदानात पळत सुटली, पाहा व्हिडीओ
Comments are closed.