बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावरुन संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, भाजपचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर राजधानी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय. भाजप (BJP) कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ते पवारांसाठी खुर्ची उचलताना दिसले. यावरुन त्यांच्यावर अनेक टींकांचा भडीमार झाला. यावर प्रतिक्रिया देताना मात्र राऊतांची जीभ घसरली. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चु**गिरी बंद करा, असं राऊत म्हणाले होते. हे आक्षेपार्ह वक्तव्य आता त्यांना चांगलंच भोवल्याचं दिसतंय.

भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत (Deepti Rawat) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता दिल्लीमध्ये कलम 500 आणि 509 अंतर्गत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांचं ते वक्तव्य आक्षेपार्ह असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेत्री नोरा फतेही ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात?; ‘त्या’ व्हायरल फोटोंनी वाढवली उत्सुकता

Omicron ने धाकधूक वाढवली; ‘ही’ रूग्णसंख्या म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल?

‘मोदींना धन्यवाद देण्यासाठी शेजाऱ्यांना चहा पाजा’; रावसाहेब दानवेंनी दिला अजब सल्ला

‘त्या’ गटारगंगेतून मुंबईला बाहेर काढायचंय; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

“म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More