बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

जयपूर | बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त कतरिना आणि विकीच्या शाही विवाहसोहळ्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. 7 डिसेंबर ते  9 डिसेंबर या दरम्यान हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

हा शाही लग्नसोहळा राजस्थान (Rajasthan) येथील 700 वर्ष जुन्या किल्ल्यात पार पडणार आहे. यासाठी सवाई मधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. याचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हा लग्नसोहळा सुरूही झाला नाही त्याआधीच कतरिना आणि विकी विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

जयपूरमधील चौथ माता मंदिराकडे जाणारा रस्ता विकी कतरिनाच्या लग्नासाठी बुक केलेल्या किल्ल्यासमोरून जातो. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. हा रस्ता अडवल्याबद्दल कतरिना, विकी, हॉटेल व्यवस्थापक आणि जिल्हाधिकाऱ्यांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चौथ माता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हवाला देत वकील नेत्रबिंदु सिंह जदौन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जिल्हा विधी प्राधिकरणात ही तक्रार दाखल करण्यात आली असून या लग्नसोहळ्यादरम्यान सामाईक मार्ग सुरळीत ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

चिंता वाढली! पुणे आणि डोंबिवली पाठोपाठ ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More