बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी राणे पिता पुत्रांना मोठा झटका

मुंबई | दिशा सालियानने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली. तिच्यावर बलात्कार झाला असून ती गरोदर होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता.

नारायण राणेंच्या या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकारण रंगत असताना राणे पिता पुत्रांना मोठा झटका मिळाला आहे.

नारायण राणे व नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियानची बदनामी आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी सालियान कुटुंबीयांनी राणे पिता पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

दरम्यान, नारायण राणे व नितेश राणे यांनी दिशा सालियानच्या मृत्यूबद्दल अनेक खुलासे केले. यानंतर आमच्या मुलीची बदनामी थांबवा, असं आवाहन दिशाच्या आई-वडिलांनी केलं होतं. अखेर सालियान कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

सुरू करा हा व्यवसाय अन् महिन्याला कमवा 3 लाख रूपये

येत्या काही तासात ‘या’ भागात पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

“शरद पवारांना 2024ला सर्वात मोठी भेट द्यायचीये, कामाला लागा”

“हे पाकिस्तानी समर्थकांचे मंत्रिमंडळ, असे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात कधीच झाले नाही”

“मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाजीराजे यांचं उपोषण सोडवावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More