संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हे दाखल

पिंपरी | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. पिंपरी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. 

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी हिंसाचार झाला. ज्यामध्ये अनेक वाहने जाळण्यात आली तसेच नागरिकांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे सूत्रधार असल्याचा आरोप भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. 

दरम्यान, भारिपच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी पोलिसात धाव घेतलीय आणि संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.