देश

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल!

नवी दिल्ली | दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारप्रकरणी आणखीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचंही कळतंय.

शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर रॅलीसाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना सन्मानित करण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती. पण शेतकरी आंदोलकांनी हा मार्ग मानला नाही. निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच ते निघाले. अनेक जागांवर त्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या, त्यात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचारी जखमी झाले आणि सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे, असं दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

 

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?; समोर आला धक्कादायक व्हिडीओ

शीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला?; पती गौतम करजगींचे धक्कादायक आरोप

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याला धक्काही लावला नाही!

पहिले ते चौथीचे वर्ग कधी सुरु होणार?; शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

“हा माणूस कृषी मंत्री होता याचं आश्चर्य वाटतं, इतक्या निर्लज्जपणे शेतकऱ्यांबद्दल बोलतोय”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या