चासकमान धरणाच्या पाण्याचा प्रश्न पेटला, ऊस मात्र जळाला

पुणे | शिरुर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये चासकमान धरणाच्या पाण्यावरुन संघर्ष पेटलाय. या संघर्षात शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ऊसशेती धोक्यात आलीय. याठिकाणी पाण्याअभावी उसाचं पीक जळू लागल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

याप्रकरणी काही राजकारण्यांकडून सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून होतोय. तसेच आम्हाला पाणी द्यायचं नव्हतं तर कालव्यासाठी आमच्या जमिनी कशाला घेतल्या, असा सवालही विचारला जातोय.