बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू आहे!”

मुंबई | भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना सोलापुरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच वाद पेटला आहे. या हल्ल्यानंतर अनेक भाजप नेते राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. आता आमदार मेघना बोर्डीकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा जाहीर निषेध, असं ट्वीट मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे. तसेच गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असं देखील मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान,  या हल्ल्याविषयी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे.

गोपीचंद पडळकरांनी याबाबत ट्विट करत अज्ञात व्यक्तिचा त्यांच्या गाडीवर दगड टाकतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. महाराष्ट्राचा बुलंद वाघ शरद पवार, असं दगडफेक करणारा घोषणा देताना व्हिडीओत दिसत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘दगडफेक करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील तर…’; गोपीचंद पडळकरांचा व्हिडीओ टाकत निशाणा

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य नसून कृषी कायद्यात बदल आवश्यक”

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More