मनोरंजन – www.thodkyaat.com https://www.thodkyaat.com Tue, 06 Dec 2022 08:53:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.1.1 दिव्या अग्रवाल लवकरच करणार या व्यावसायिकाशी लग्न, 9 महिन्यांपूर्वी झालं होतं ब्रेकअप https://www.thodkyaat.com/on-her-birthday-divya-made-a-big-revelation-about-her-boyfriend/ Tue, 06 Dec 2022 08:53:51 +0000 https://www.thodkyaat.com/?p=1015 divya 1 e1670315824432मुंबई | दिव्या अग्रवाल(Divya Agarwal) ही आटीटीवर बिग बाॅस(Bigg Boss) विजेती ठरली आहे. या शोमुळं दिव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यामुळं दिव्याचे असंख्य चाहते आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत जोडली गेलेली आहे. इंस्टाग्रामवरही तिचे 3 मिलियन फाॅलोअर्स आहेत. सोमवारी दिव्याने तिचा 30 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिनं चाहत्यांना मोठा सुखद धक्का […]]]> divya 1 e1670315824432

मुंबई | दिव्या अग्रवाल(Divya Agarwal) ही आटीटीवर बिग बाॅस(Bigg Boss) विजेती ठरली आहे. या शोमुळं दिव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यामुळं दिव्याचे असंख्य चाहते आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत जोडली गेलेली आहे. इंस्टाग्रामवरही तिचे 3 मिलियन फाॅलोअर्स आहेत.

सोमवारी दिव्याने तिचा 30 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिनं चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला. तिचा वाढदिवस साजरा करत असताना तिच्या एका मित्राने तिला प्रपोज केलं आणि दिव्यानं ते मान्यही केलं.

दिव्याला तिचा मित्र अपूर्व पाडगावकरनं(Apurva Padgaonkar) बर्थडे पार्टी दरम्यान गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. आणि दिव्यानं ते मान्यही केलं आहे. सध्या दिव्या आणि अपूर्वचे पार्टीदरम्यानचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

दिव्यानंही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत अपूर्व आणि दिव्या खुप आनंदी दिसत आहेत. तिनं या फोटोंत अपूर्वनं तिला घातलेली अंगठीही दाखवली आहे. या अंगठीवर बायco असं लिहिलं आहे.

हे पाहून सर्वांना असा प्रश्न पडत असेन की, नक्की अपूर्व आहे तरी कोण. अपूर्व एक व्यापारी आहे. त्याचे मुंबईमध्ये चार रेस्टाॅरंट आहेत. तसेच तो महिलांचे मास्टर क्लास घेतो आणि त्यांना पेटींग काढणं, स्वयंपाक करणं या गोष्टी शिकवतो.

दरम्यान, अपूर्वही सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचे इंस्टाग्रामवर 59 हजारापेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. दिव्या-अपूर्वच्या नात्याची खबर लागल्यापासून चाहत्यांचा दोघांवर शुभेच्छांचा पाऊस सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

]]>
जागतिक स्तरावरचा ‘हा’ मान मिळवणारी दीपिका ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री https://www.thodkyaat.com/deepika-will-become-the-first-indian-actress-to-receive-the-ha-award-at-the-global-level/ Tue, 06 Dec 2022 06:07:27 +0000 https://www.thodkyaat.com/?p=975 deepika 1 e1670306391944मुंबई| सध्या बाॅलिवूडची(Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोनकडं(DeepikaPadukone) पाहिलं जातं. दीपिकानं दमदार अभिनयानं आणि मनमोहक सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. केवळ बाॅलिवूडच नव्हे तर तिनं हाॅलिवूडमध्येही मजल मारली आहे. त्यामुळं तिचे असंख्य चाहते आहेत. तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. कलाक्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्काराची ती मानकरी ठरली आहे. त्यातच दीपिकाच्या नावावर आणखी एक रेकाॅर्ड […]]]> deepika 1 e1670306391944

मुंबई| सध्या बाॅलिवूडची(Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोनकडं(DeepikaPadukone) पाहिलं जातं. दीपिकानं दमदार अभिनयानं आणि मनमोहक सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. केवळ बाॅलिवूडच नव्हे तर तिनं हाॅलिवूडमध्येही मजल मारली आहे. त्यामुळं तिचे असंख्य चाहते आहेत.

तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. कलाक्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्काराची ती मानकरी ठरली आहे. त्यातच दीपिकाच्या नावावर आणखी एक रेकाॅर्ड होणार असल्याच्या चर्चा आहेत.

यावर्षीच्या फिफा वर्ल्ड कप ट्राॅफीचे(Fifa World Cup 2022) अनावरण दीपिका पादुकोनच्या हस्ते केले जाणार आहे. त्यामुळं हा मान मिळणारी दीपिका भारताची पहिली अभिनेत्री ठरणार आहे.

फिफा ही फूटबाॅलची जागितक स्तरावराची सगळ्यात मोठी मॅच असते. त्यामुळं दीपीकाला हा जागतिक स्तरावरचा मान मिळणार असल्यानं तिचे चाहतेही प्रचंड खुश आहे.

स्वत: दीपिकानंच यासाठी कतारला जात असल्याची माहिती दिली आहे,अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळं फिफा वर्ल्ड कप ट्राॅफीचे अनावरण करणारी ती पहिली भारतीय महिला कलाकार ठरणार आहे.

दरम्यान, गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेने निवडलेल्या जगातील सर्वात सुंदर स्रियांच्या यादीत देखील तिचं नाव पहिल्या दहामध्ये आहे. या संस्थेने निवडलेल्या सुंदर स्रियांच्या यादीत टाॅप टेनमध्ये असणारी सुद्धा ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती.

महत्वाच्या बातम्या-

]]>
पाठक बाईंनी लग्नात घेतलेला भन्नाट उखाणा होतोय व्हायरल https://www.thodkyaat.com/pathak-bais-bizarre-wedding-ceremony-is-going-viral/ Mon, 05 Dec 2022 13:46:15 +0000 https://www.thodkyaat.com/?p=941 rana anjali 1मुंबई | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangla) या राणा दा-पाठक बाईंच्या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळं रिअल लाईमध्ये या राणा दा-पाठक बाईंनी म्हणजेच हार्दिक जोशी(Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deodhar) यांनी लग्नगाठ बांधल्यानं चाहते आनंदी आहेत. 2 डिसेंबरला हार्दिक-अक्षया लग्न बेडीत अडकले. सध्या त्यांच्या लग्नाचे तसेच हळदी, मेहंदी आणि […]]]> rana anjali 1

मुंबई | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangla) या राणा दा-पाठक बाईंच्या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळं रिअल लाईमध्ये या राणा दा-पाठक बाईंनी म्हणजेच हार्दिक जोशी(Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deodhar) यांनी लग्नगाठ बांधल्यानं चाहते आनंदी आहेत.

2 डिसेंबरला हार्दिक-अक्षया लग्न बेडीत अडकले. सध्या त्यांच्या लग्नाचे तसेच हळदी, मेहंदी आणि संगीताच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. त्यातच अक्षयानं भन्नाट उखाणा घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिनं घेतलेला उखाणा असा की, खर तर उखाणा असतो दोन ओळींचा फक्त, पण संधी चालून आलीय तर होईन म्हणतेय व्यक्त. कामासाठी घर सोडून धरली वेगळी वाट, प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट. मग राणाजी राणाजी करत दिवस गेले सरून, राणा सारख्या खऱ्या माणसाचा ठेवला हात धरून.

तुझ्यात जीव रंगला म्हणता म्हणता, वेळ आली निघायची, कुठेतरी खात्री होती पुन्हा एकत्र येण्याची. दोघांनी मिळून घेतला निर्णय आयुष्यभराच्या साथीचा,अक्षयतृतीया मुहूर्त ठरला आमच्या साखरपुड्याचा.

उखाणा घेते घेते म्हणत कहानी झाली सांगून, हो हो घेतीय नाव ऐका कान देऊन, उखाण्यासाठी विचार करून शक्कल लढवलीय अशी, माझंही नाव घेते तेवढ्यात अक्षया हार्दिक जोशी.

अक्षयाचा हा उखाणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच अनेकजण कमेंट्स करत तिच्या या उखाण्याची स्तुती करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

]]>
ड्रग्ज प्रकरणात हिंदू महासंघांची एंट्री; आर्यन खानच्या अडचणीत वाढ https://www.thodkyaat.com/aryan-khans-troubles-rise-against-hindu-federation-bail/ Mon, 05 Dec 2022 13:15:17 +0000 https://www.thodkyaat.com/?p=917 Aryan khanमुंबई | बाॅलिवूड (Bollywood) मध्ये ड्रग्ज प्रकरण आता नित्याचं झालं आहे. त्यातल्या त्यात याप्रकरणाला अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh) च्या मृत्यूप्रकरणानंतर जोर आला आहे. आजही अनेक अभिनेते-अभिनेत्री सध्या याप्रकरणात अडकले आहेत. यातच अभिनेता शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनेक महिन्यांची कारवाई आणि चौकशीनंतर तो […]]]> Aryan khan

मुंबई | बाॅलिवूड (Bollywood) मध्ये ड्रग्ज प्रकरण आता नित्याचं झालं आहे. त्यातल्या त्यात याप्रकरणाला अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh) च्या मृत्यूप्रकरणानंतर जोर आला आहे. आजही अनेक अभिनेते-अभिनेत्री सध्या याप्रकरणात अडकले आहेत.

यातच अभिनेता शाहरुख खानचा (ShahRukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. अनेक महिन्यांची कारवाई आणि चौकशीनंतर तो निर्दोष असल्याचं सिद्ध झाले आणि त्याची सुटका करण्यात आली होती.

त्यांच्या या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्यात आलं आहे. याबद्दल बोलताना हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे आणि अॅॅड सुबोध पाठक म्हणाले, “आर्यन खानला घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात पकडल होते.”

त्यावेळी आर्यन खानला त्याचा गु्न्हा मान्य होता. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी देखील ते मान्य केलं होतं. यामुळे सत्र न्यायालयाने दोन वेळा आर्यन खानचा जामीन (Bail) देखील दोनवेळा नाकारण्यात आला होता.

इतकं सगळ असून देखील तपास यंत्रणांनी सबळ पुरावे नसल्याचं कारण देत त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यांनी जे केलं ते अधिकार क्षेत्राच्या बाहेरचं होतं. याप्रकरणात पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत की नाहीत हे न्यायालयाच्या खटल्या दरम्यान ठरवलं जाणार आहे. तो न्यायालयाचा अधिकार आहे.

पोलिसांनी मात्र आरोपीला निर्दोष मुक्त करण्याच्या अधिकारावर आक्रमण केलं आहे, असं ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाला विरोध करत हिंदूमहासंघाने 13 जुलै 2022 रोजी कोर्टाला आवाहन दिलं आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

]]>
‘…तेव्हा लोकांना कळेल’; ऋतुराज सोबतच्या अफेअरच्या चर्चेवर सायलीचा खुलासा https://www.thodkyaat.com/saili-sanjeev-kept-silent-on-the-discussion-of-the-affair-latest-marathi-news/ Mon, 05 Dec 2022 06:25:51 +0000 https://www.thodkyaat.com/?p=837 Ruturaj And sayaliमुंबई | क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याने अलिकडंच पार पडलेल्या विजय हजारे सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने 7 बाॅलमध्ये 7 सिक्स मारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनतर ऋतुराजच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. या खेळीनंतर पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव ( Sayali Sanjeev) यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु झाली. सायली हीचं […]]]> Ruturaj And sayali

मुंबई | क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याने अलिकडंच पार पडलेल्या विजय हजारे सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने 7 बाॅलमध्ये 7 सिक्स मारत एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनतर ऋतुराजच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला.

या खेळीनंतर पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड आणि अभिनेत्री सायली संजीव ( Sayali Sanjeev) यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु झाली. सायली हीचं नाव अनेकदा ऋतुराजशी जोडलं गेलं आहे. ऋतुराज गायकवाडने सायलीच्या एका फोटोवर कंमेट केली होती त्यानंतरचं त्यांच्या अफेरची चर्चा सुरु झाली होती.

यावरच सायलीने तिच्या एका मुलाखती (interviews) दरम्यान तिचं मत मांडलं आहे. या अफेरच्या अफवाबद्दल आणि गाॅसिपिंगमुळे वैयक्तिक आयुष्यावर खूप परिणाम होतात. तो एक चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला याविषयी आमचं बोलणं देखील झालं होतं. त्यावेळी या अफवांवर लक्ष दिलं नाही.

‘चलो जानो दो’ असं करत त्या अफवांकडे (rumours) आम्ही दुर्लक्ष करत राहिलो. जेव्हा खरं समोर येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल असं आमचं म्हणणं होतं. जेव्हा आम्ही आमच्या जोडीदांरांशी लग्न करु तेव्हा सगळ्या लोकांना कळेल.

गेली दीड वर्षे झाली या अशा अफवा पसरत आहेत. यामुळे आमच्या मैत्रीवर (friendship) देखील परिणाम झाला आहे. आम्ही आता मित्र म्हणून देखील बोलू शकत नाही. मला कळत नाहीये की आमची एकमेकांशी नावं का जोडली गेली, असं मत सायलीने व्यक्त केलं आहे.

सायली संजीव हिच्या ‘शुममंगल सावधान’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकेला प्रेक्षकांनी (audience) चांगली पसंती दिली होती. सध्या तिच्या नुकताच आलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

]]>
राणा दा-पाठक बाईंच्या रिसेप्शन पार्टीची होतेय जोरदार चर्चा https://www.thodkyaat.com/rana-da-pathak-bais-reception-party-is-being-heavily-discussed/ Sat, 03 Dec 2022 09:11:25 +0000 https://www.thodkyaat.com/?p=767 akshaya hardik 2पुणे | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangala) या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत राणा दा- पाठक बाईंची अत्यंत सुंदर प्रेमकहानी दाखवली गेली. या जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यामुळं या जोडीचे अनेक चाहते आहेत. मालिकेमुळं ही जोडी लोकप्रियेतच्या शिखरावर पोहचली आहे. या जोडीनं त्यांच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी सुखद धक्का दिला. राणा दा-अंजलीनं म्हणजेच अभिनेत्री […]]]> akshaya hardik 2

पुणे | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangala) या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत राणा दा- पाठक बाईंची अत्यंत सुंदर प्रेमकहानी दाखवली गेली. या जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यामुळं या जोडीचे अनेक चाहते आहेत.

मालिकेमुळं ही जोडी लोकप्रियेतच्या शिखरावर पोहचली आहे. या जोडीनं त्यांच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी सुखद धक्का दिला. राणा दा-अंजलीनं म्हणजेच अभिनेत्री हार्दिक जोशी(Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deodhar) यांनी रिअल लाईमध्येही दोघांचं एकमेकांंवर प्रेम असल्याचं कबूल केलं.

या आनंदाच्या बातमीनंतर सर्वांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली. शुक्रवारी म्हणजेच 2 डिसेंबर रोजी हार्दिक-अक्षया लग्न बेडीत अडकले. पुण्यात थाटामाटात त्यांचं लग्न पार पडलं.

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकजण कमेंट्सच्या माध्यमातून त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. आता त्यांच्या लग्नापाठोपाठ चर्चा रंगलीय ती त्यांच्या रिसेप्शन पार्टीची.

शुक्रवारी त्यांचा लग्नानंतर डोळ्याचे पारणे फेडणारी रिसेप्शन पार्टी देखील झाली. या पार्टीत दोघांनीही पर्पल रंगाचे कपडे घातले होते. अक्षयानं गळ्यात नेकलेस आणि लग्नातील लांब मंगळसूत्र घातले होते. गळ्यातील मंगळसूत्रामुळं तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं.

या रिसेप्शनचे फोटो अक्षयानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंत तिचे आणि हार्दिकचे आई-बाबा देखील दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

]]>
प्राजक्ताच्या ‘त्या’ पोस्टवर संतापले चाहते, म्हणाले तू पण… https://www.thodkyaat.com/fans-angry-at-prajaktas-that-post-said-you-too/ Sat, 03 Dec 2022 08:14:47 +0000 https://www.thodkyaat.com/?p=748 prajkta mali 1 e1670054736364मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. तिच्या अनेक मालिका, चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती सोशल मीडियावर हटके फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. या फोटो-व्हिडीओंवर चाहत्यांचा लाईक्स-कमेंट्सचा पाऊस सुरू असतो. पण नुकतंच प्राजक्तानं बोल्ड […]]]> prajkta mali 1 e1670054736364

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. तिच्या अनेक मालिका, चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती सोशल मीडियावर हटके फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. या फोटो-व्हिडीओंवर चाहत्यांचा लाईक्स-कमेंट्सचा पाऊस सुरू असतो.

पण नुकतंच प्राजक्तानं बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत तिनं हाय स्टाईलचा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच या ड्रेसमध्ये तिनं बोल्ड लूक दिले आहेत. परंतु हे फोटोशूट तिला महागात पडत आहे.

तिनं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळं तर चाहते जास्तच संतापले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, जर तुमचे शरीर चांगल्या शेपमध्ये असेल तर दाखवायला हरकत नाही. या कॅप्शनमुळं तिला आता ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे.

एका नेटकऱ्यानं या पोस्टला कमेंट केली आहे की, तुला सईची सावली पडली. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्र्या होत्या ज्या आवडायच्या, त्यापैकी तू देखील होती, पण आता तू पण लाज सोडली. तसेच काहीजण म्हणत आहेत की, तुझ्या विषयीचा आदर कमी होत आहे.

दरम्यान, तिच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजमधील तिच्या बोल्ड लुकमुळंही तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता तिच्या या बोल्डलुकमुळं नेटकऱ्यांनी तिला पुन्हा धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

]]>
मोठी बातमी! अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या जाळ्यात https://www.thodkyaat.com/nora-is-again-in-the-thick-of-the-interrogation/ Fri, 02 Dec 2022 13:25:44 +0000 https://www.thodkyaat.com/?p=652 nora fatehinनवी दिल्ली | महाठग सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar) सध्या तुरुगांत आहे. अनेक अभिनेत्रींना आणि व्यवसायिकांना लुबाडणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याला ईडीने अटक केली होती. त्याच्या या अटकेत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचे नाव समोर आले होते. अनेकदा ईडीकडून तीची कसून चौकशी करण्यात आली आहे. नुकताच जॅकलीनला थोडासा दिलासा मिळाला आहे. अटकेपासून तिचा बचाव झाला आहे. तर दुसरीकडे आता अभिनेत्री […]]]> nora fatehin

नवी दिल्ली | महाठग सुकेश चंद्रशेखर(Sukesh Chandrasekhar) सध्या तुरुगांत आहे. अनेक अभिनेत्रींना आणि व्यवसायिकांना लुबाडणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याला ईडीने अटक केली होती. त्याच्या या अटकेत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचे नाव समोर आले होते.

अनेकदा ईडीकडून तीची कसून चौकशी करण्यात आली आहे. नुकताच जॅकलीनला थोडासा दिलासा मिळाला आहे. अटकेपासून तिचा बचाव झाला आहे. तर दुसरीकडे आता अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

पीटीआयच्या (PTI) रिपोर्टनुसार सुकेश चंद्रशेखरला अटक केलेल्या मनी लाॅन्ड्रीग(Money Laundering) प्रकरणात नोरा फतेहीचं नाव देखील आलं आहे. त्यासाठीची जबानी नोंदवण्यासाठी नोरा शुक्रवारी ईडी कार्यालयात गेली असल्याचं पहायला मिळालं.

दुसरीकडे अजून एका वादावरुन ती सध्या टिकेची धनी ठरत आहे. एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर नोरा फतेही नाचत होती. त्यावेळी गर्दीतील एका चाहत्याने तिच्याकडे भारताचा (India) तिरंगा झेंडा दिला. तो झेंडा नोराने रुमालासारखा गुंडाळला. त्यामुळे नागरिकांमध्ये तिच्याविषयी रोष निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सुरेश चंद्रशेखरने जेलमधून एक पत्र लिहिलं ज्यात त्याने जॅकलीनचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सागितलं. मी करत असलेलं कोणतंही काम जॅकलीनला माहित नव्हतं. तीनं फक्त माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा केली होती. ती आपल्याशी लग्न देखील करणार होती असं त्यानं त्या पत्रात लिहिलं होतं.

सुकेश चंद्रशेखर याने अनेकांना खोटे अमिश दाखवत पैसे लुटले आहेत. एका मोठ्या प्रकरणात 200 कोटींची अफरातफर केल्याचं समजात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेहीला महागडे गिफ्ट दिल्याचं तपासात निष्पन्न झालं होते. त्यामुळे त्या दोघींची चौकशी सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

]]>
प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालचा गंभीर अपघात https://www.thodkyaat.com/serious-accident-of-famous-singer-zubin-netial/ Fri, 02 Dec 2022 09:18:54 +0000 https://www.thodkyaat.com/?p=622 jubin nutiyala 1 e1669971420993मुंबई | गायक जुबिन नोटियालनं(Jubin Nautiyal) एका पेक्षा एक अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सध्या तरूणाईचा जुबिन हा आवडता गायक आहे. तसेच शेरशहा(Shershaah) चित्रपटातील त्यानं गायलेलं ‘राता लंबिया’ हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय ठरलं. परंतु नुकतीच जुबिनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. नुकताच जुबिनचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुबिन त्याच्याच […]]]> jubin nutiyala 1 e1669971420993

मुंबई | गायक जुबिन नोटियालनं(Jubin Nautiyal) एका पेक्षा एक अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सध्या तरूणाईचा जुबिन हा आवडता गायक आहे. तसेच शेरशहा(Shershaah) चित्रपटातील त्यानं गायलेलं ‘राता लंबिया’ हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय ठरलं. परंतु नुकतीच जुबिनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

नुकताच जुबिनचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुबिन त्याच्याच घरात शिडीवरून घसरून पडला आहे. त्यामुळं त्याला दुखापत झाली आहे. आता त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घसरून पडल्यामुळं त्याचं कमरेच हाड मोडलं आहे. त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. त्याच्या उजव्या हाताचे ऑप्रेशन केले जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच त्याच्या दातावरही शस्रक्रिया केली जाणार आहे.

जुबिनच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जुबिन लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना देखील करत आहेत.

जुबिनला आणि योहानाला गुरूवारी गाण्याच्या लाॅन्चच्या वेळी स्पाॅट करण्यात आलं होतं. परंतु शुक्रवारी त्याच्या अपघाताची बातमी ऐकताच सर्वांना धक्का बसला आहे. त्याच्या प्रकृतीबाबत सध्या चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जुबिनला काही दिवसांपूर्वी ट्रोलींगचा सामनाही करावा लागला होता. तो ज्या कार्यक्रमात गाणं गाणार होता, त्याचा आयोजक गुन्हेगार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळं त्याला विरोध केला जात होता.

महत्वाच्या बातम्या-

]]>
अखेर राणा-अंजली अडकले लग्नाच्या बेडीत! https://www.thodkyaat.com/finally-rana-and-anjali-got-married-in-pune/ Fri, 02 Dec 2022 07:49:39 +0000 https://www.thodkyaat.com/?p=610 akshaya hardik 1पुणे | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jiv Rangla) या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी जोडी म्हणजे राणा-अंजलीची(Rana-Anjali). या जोडीला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं होतं. आता छोटा पडदा गाजवलेले हे अक्षया(Akshaya Deodhar) आणि हार्दिक(Hardeek Joshi) रिअल लाईमध्येही नुकतेच लग्नबेडीत अडकले आहे. त्यांचा विवाह 2 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडला आहे. त्यांच्या […]]]> akshaya hardik 1

पुणे | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jiv Rangla) या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी जोडी म्हणजे राणा-अंजलीची(Rana-Anjali). या जोडीला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं होतं.

आता छोटा पडदा गाजवलेले हे अक्षया(Akshaya Deodhar) आणि हार्दिक(Hardeek Joshi) रिअल लाईमध्येही नुकतेच लग्नबेडीत अडकले आहे. त्यांचा विवाह 2 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडला आहे. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

हे लग्न पारंपारिक पद्धतीनं पार पडलं आहे. दोघंही वधू-वरच्या लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. अक्षयानं लाल रंगाचा शालू परिधान केला होता. त्यावर नाकात नथ आणि नक्षीदार दागिनं घालून तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच हार्दिकनंही धोतर घालत पारंपारिक लूक केला होता.

सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस सुरू आहे.

दरम्यान, लग्नापूर्वीही अक्षया- हार्दिकनं हळद, मेहंदी, संगीताचे कार्यक्रमही अत्यंत धुमधडाक्यात केले. याचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

पडद्यावर राणा-अंजलीची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. आता रिअल लाईमध्येही त्यांचा मॅरीड लाईफचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळं त्यांचे चाहतेही प्रचंड आनंदी आहेत.

महत्वाच्या बातम्या-

]]>