बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस घेतल्यानंतर परिणीती चोप्राची झाली ‘अशी’ अवस्था!

मुंबई | बालिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिची बहिण अभिनेत्री परिणीती चोप्राने कोरोनाची लस घेतली असून त्यानंतर तिची जी अवस्था झाली त्याचा फोटो प्रियांकाने काढला होता. त्यानंतर परिणीतीने आपले दोन सेल्फी आणि प्रियांकाने काढलेले फोटो इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

लस घेतल्यानंतर परिणीती चांगलीच खूश होती. पण नंतर हात दुखू लागल्यानंतर तिचा मूड बदलला. काऊचवरचा तिचा हा फोटो याचा पुरावा आहे. परिणीतीच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

परिणीतीचे यावर्षी तीन सिनेमे रिलीज झालेत. संदीप और पिंकी फरार, द गर्ल ऑन द ट्रेन आणि सायना. सायना या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं होतं. हा सिनेमा बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर होता. परिणीतीने यात सायनाची भूमिका साकारली होती.

दरम्यान, आपल्या अभिनयाने परिणीती चोप्राने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर दिग्गज अभिनेत्यांसह परिणीतीची केमिस्ट्री चांगलीच जुळली. आता परिणीती अधिक सिलेक्टीव्ह झाली आहे. केवळ आॅफर्स मिळतायेत म्हणून सिनेमा स्विकारणार नसल्याचं तिने म्हटलं आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

थोडक्यात बातम्या-

करीना कपूरचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात, बीडमध्ये तक्रार दाखल

“बैलगाडीवरून कोसळलात तसे सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं”

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा

‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More