Top News

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, आता परवानगीशिवाय CBI ला महाराष्ट्रात येता येणार नाही

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली आहे.

यापुढे सीबीआयला कोणत्याही प्रकरणी महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. सीबीआयला महाराष्ट्रात तपास करण्यासाठी येण्याआधी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

याआधी आंध्र प्रदेशसह पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड सरकारने देखील कलम 6 चा उपयोग करुन सीबीआयला राज्यात ‘नो एन्ट्री’ केली होती.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

ओ जाने वाले, हो सके तो लौट के आना…- सुधीर मुनगंटीवार

सरकार शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करुन त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करेल- उद्धव ठाकरे

नुकसानग्रस्त कुटुंबांना पार्थ पवार फांऊडेशनचा मदतीचा हात

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या