मनोरंजन

सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीचा विरोध, म्हणाली…

मुंबई | सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणं बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिली आहे. सर्वोच न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत सीबीआयने या प्रकरणापासून दूर राहिलं पाहिजे असंही तिने म्हटलं आहे.

रिया चक्रवर्तीने वकिलांमार्फेत ही प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरु केला असून रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बिहार सरकारने सुशांत सिंह प्रकऱणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी शिफारस केली होती. केंद्राने अधिकृत सूचना दिल्यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला असून यानंतर बिहार पोलीस जे तपासासाठी मुंबईत आले होते तेदेखील राज्यात पुन्हा परतले आहेत. रिया चक्रवर्तीने सुशांतचा मृत्यू मुंबईत झाला असल्याने बिहार पोलीस नाही तर महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला पाहिजे असा युक्तिवाद केला आहे.

बिहार सरकारने अख्त्यारित येत नसतानाही सीबीआयकडे प्रकरणाचा तपास सोपवला आहे, असं रियाने म्हटलं आहे. रियाने सीबीआयकडे तपास देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून तिथे योग्य प्रकारे तपास होणार नाही, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

90 टाके पडले पण बहिणीला कुत्र्यापासून वाचवलं; 6 वर्षीय मुलाच्या धाडसाचं जगभरातून कौतुक

ब्राझीलच्या ह्युंदाईमध्ये Employee of the Year चक्क एका कुत्र्याने मिळवला…!

कली पुरी यांना २०२० वर्षातील ‘सर्वात प्रभावशाली महिला’ पुरस्कार देऊन सन्मानित

एकनाथ खडसेंनाही वाढीव विजबिलाचा ‘शॉक’, एका महिन्याचं बिल तब्बल…..

आनंदाची बातमी! “कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांना शंभर टक्के यश”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.