बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उपमुख्यमंत्री अजित पवारांची सीबीआय चौकशी करा’; भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरून सापडलेल्या गाडीच्या प्रकरणात अनेक ट्विस्ट आले. या प्रकरणात पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे दोषी आढळून आले होते. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे केलेले आरोप यामुळे हे प्ररकरण अजुनही चर्चेत आहे.

सचिन वाझेने आपल्या 3 तीन पानी पत्रात शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मात्र अशातच सचिन वाझे प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेते मंत्री अनिल परब आणि अजित पवार यांची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं समजत आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाचे आरोप केल्याने देशमुख यांना सीबीआय चौकशी झाली होती. सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिला होता. त्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकत्र येत सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे पवारांचे भाजपसोबत चांगले संबंध असल्याचं बोललं जातं.

थोडक्यात बातम्या- 

बारावीच्या परीक्षा घेऊन तुम्हाला काय वेगळं सिद्ध करायचंय?; सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही”

“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेंशन वाढवलं; राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता

‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्यांसोबत मनसे आमदार मैदानात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More