Top News महाराष्ट्र मुंबई

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

मुंबई | पालघर साधू हत्याकांडाचा तपास व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.

पालघर साधू हत्याकांडप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र, पोलिसांनी कदम यांना ताब्यात घेऊन रॅली काढण्यास मज्जाव केल्याने भाजप नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करत राम कदम यांची सुटका केली.

पालघर प्रकरणी राज्य सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, असं राणे म्हणाले.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, अशी टीका राणेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘बिहारच्या विकासाठी भाजप नत्यांनी एकत्र काम करावं, त्यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल’

“संजय राऊतांना आता कळलं असेल, राज ठाकरे मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपालांना का भेटायला गेले”

“संजय राऊत हे नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात”

धक्कादायक! प्रेयसीवर हल्ला करत स्वत:च्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब

भाजप नेते राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या